कृषी व्यवसाय

कृषी व्यवसाय


ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळ लवकरच अॅग्रो सर्व्हिस सेंटर घेऊन येत आहोत. यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना थेट विविध वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांशी जोडत आहोत जेणेकरून शेतकर्‍यांना सर्वोत्तम किंमत व गुणवत्ता मिळेल. शेतकरी आमच्या वेबसाईट वरून किंवा आमच्या केंद्राकडून आणि माफक दरामध्ये खते, कीटकनाशके, बियाणे, सिंचन, शेतीची व शेती पूरक व्यवसायाची सर्व साधने व पशुखाद्य इत्यादी खरेदी करु शकतात.

ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाच्या अग्रगण्य उपक्रमाच्या माध्यमातून खते, बियाणे, औषधे, अवजारे, यांच्यापासून ते जनावरांच्या खाद्य पर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे उद्दीष्ट आहे. महामंडळाच्या अॅग्रो सर्व्हिसेस सेंटरच्या मदतीने जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि वेगाने वाढणार्‍या कृषी क्षेत्रात सहभागी होण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे.