सध्या नोकरीच्या संधी

सध्या कोणतीही पदासाठी जागा उपलब्ध नाहीत.

कृषी मित्र

कृषी मित्र हे महामंडळाच्या राज्यव्यापी साखळीमधील एक मूलभूत आणि ग्राउंड लेव्हलचे पद आहे. हे पद प्रत्येक गावात एक आहे असणार आहे. कृषी मित्रच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत: अधिक वाचा

  • जिल्हा व्यवस्थापक आणि तालुका समन्वयक पदासाठीच्या उमेदवारांची निवड झाल्यानंतरच कृषी मित्र पदासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या अर्जांची छाननी केल्यानंतर फक्त पात्र उमेदवारांचीच आवश्यकतेनुसारच मुलाखतीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सदर मुलाखतीसाठी शुल्क आकारण्यात येईल याची सर्व पात्र अर्जदारांनी नोंद घ्यावी. अपात्र अर्जदारांना कोणताही प्रकारचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष संप्रर्क करण्यात येणार नाही याची दखल घेण्यात यावी. मुलाखतीसाठी फक्त पात्र अर्जदारांनाच मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेलद्वारे १५ ते २० दिवस अगोदर कळविण्यात येईल.
  • मुलाखत आणि निवड प्रकियासाठी फक्त ई-मेल द्वारे माहिती दिली जाईल. फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष कार्यालयामध्ये या बाबत कोणतीही माहिती दिली जाणार नाही. अपात्र अर्जदारांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधला जाणार नाही. फक्त पात्र अर्जदारांच फक्त ई-मेल द्वारे संपर्क केला जाईल.
  • अर्ज स्वीकृतीचा / उमेदवार निवडीचा किंवा अर्जदारास पात्र / अपात्र ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळ लिमिटेडचा असेल, त्यासाठी महामंडळ कोणालाही उत्तर देणास बांधील नाही.

तालुका समन्वयक

तालुका समन्वयक हे महामंडळाच्या राज्यव्यापी साखळीमधील द्वितीय स्तराचे पद आहे. हे पद प्रत्येक तालुक्यासाठी एक आहे. तालुका समन्वयक हे कृषी मित्र आणि जिल्हा व्यवस्थापक यांच्यामधील मध्यम अधिकारी आहेत. तालुका समन्वयकांची भूमिका आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत: अधिक वाचा

  • जिल्हा व्यवस्थापक पदासाठीच्या उमेदवारांची निवड झाल्यानंतरच तालुका समन्वयक पदासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या अर्जांची छाननी केल्यानंतर फक्त पात्र उमेदवारांचीच आवश्यकतेनुसारच मुलाखतीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सदर मुलाखतीसाठी शुल्क आकारण्यात येईल याची सर्व पात्र अर्जदारांनी नोंद घ्यावी. अपात्र अर्जदारांना कोणताही प्रकारचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष संप्रर्क करण्यात येणार नाही याची दखल घेण्यात यावी. मुलाखतीसाठी फक्त पात्र अर्जदारांनाच मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेलद्वारे १५ ते २० दिवस अगोदर कळविण्यात येईल.
  • मुलाखत आणि निवड प्रकियासाठी फक्त ई-मेल द्वारे माहिती दिली जाईल. फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष कार्यालयामध्ये या बाबत कोणतीही माहिती दिली जाणार नाही. अपात्र अर्जदारांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधला जाणार नाही. फक्त पात्र अर्जदारांच फक्त ई-मेल द्वारे संपर्क केला जाईल.
  • अर्ज स्वीकृतीचा / उमेदवार निवडीचा किंवा अर्जदारास पात्र / अपात्र ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळ लिमिटेडचा असेल, त्यासाठी महामंडळ कोणालाही उत्तर देणास बांधील नाही.

जिल्हा व्यवस्थापक

जिल्हा व्यवस्थापक हे महामंडळाच्या राज्यव्यापी नेटवर्कमधील उच्च स्तरीय पद आहेत. हे पद प्रत्येक जिल्ह्यासाठी एक आहे. जिल्हा व्यवस्थापक, कृषी मित्र आणि महामंडळाचे प्रकल्प संचालक यांच्यामधील मध्यम अधिकारी आहेत. तालुका समन्वयकांची भूमिकाआणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत: अधिक वाचा

  • जिल्हा व्यवस्थापक पदासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांच्या अर्जांची छाननी केल्यानंतर फक्त पात्र उमेदवारांचीच मुलाखतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर मुलाखतीसाठी शुल्क आकारण्यात येईल याची सर्व पात्र अर्जदारांनी नोंद घ्यावी. अपात्र अर्जदारांना कोणताही प्रकारचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष संप्रर्क करण्यात येणार नाही याची दखल घेण्यात यावी. मुलाखतीसाठी फक्त पात्र अर्जदारांनाच मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ई-मेलद्वारे १५ ते २० दिवस अगोदर कळविण्यात येईल.
  • मुलाखत आणि निवड प्रकियासाठी फक्त ई-मेल द्वारे माहिती दिली जाईल. फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष कार्यालयामध्ये या बाबत कोणतीही माहिती दिली जाणार नाही. अपात्र अर्जदारांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधला जाणार नाही. फक्त पात्र अर्जदारांच फक्त ई-मेल द्वारे संपर्क केला जाईल.
  • अर्ज स्वीकृतीचा / उमेदवार निवडीचा किंवा अर्जदारास पात्र / अपात्र ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळ लिमिटेडचा असेल, त्यासाठी महामंडळ कोणालाही उत्तर देणास बांधील नाही.
X

भूमिका आणि जबाबदाऱ्या

कृषी मित्र

  • १. आपल्या गावातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक, व्यापारी, कंपनी, निर्यातदार, उपभोक्ता यांना ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळा विषयी माहिती देणे व त्याचे फायदे सांगणे.
  • २. आपल्या गावातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक,व्यापारी व सेवा देणारे (वाहतूक, हमाल, वजन करणारे, मालाची गुणवत्ता ठरवणारे) यांची महामंडळाच्या पोर्टलवर नोंद करणे.
  • ३. आपल्या गावातील शेतकऱ्यांनी सध्या पेरणी व लागवड केलेले सर्व पिकाची माहिती आणि दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक यांच्याकडे असणाऱ्या पशुधनाची आणि दूधउत्पदनाची सर्व माहिती महामंडळाच्या पोर्टलवर भरणे.
  • ४. आपल्या गावातील शेतकरी, दूधउद्पादक यांना लागणारे सर्व साधने, खाते, बियाणे, औषधे, औजारे, खाद्य इ. महामंडळाच्या ऍग्रो सर्विसेस सेंटर मार्फत उपलब्ध करून देणे.
  • ५. विक्री साठी तयार असलेल्या पिकाची, दुधाची, पशुधनाची माहिती घेणे, गुणवत्ता व प्रतवारी ठरवणे.
  • ६. विक्री साठी तयार असलेल्या पिक, दुधाची, पशुधनाची व संबधित शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक यांची माहिती लॉट तयार करून विक्रीसाठी महामंडळाच्या ऍग्रो सर्विसेस सेंटरला देणे .
  • ७. विक्री व्यवहार झाल्यावर शेती मालचे वजन करून, पशुधन, दुधाचे संकलन करून पशुधन महामंडळाच्या ऍग्रो सर्विसेस सेंटरवर पोहचवणे, बिले व खरेदी-विक्रीचा करार तयार करणे.
  • ८. विक्री झालेला शेती माल, दुधाची, पशुधन व्यवस्थित व्यापारी/उपभोक्ता यांच्यापर्यंत पोहचेल याची व्यवस्था करणे.
  • ९. महामंडळाच्या पोर्टलवर उपलब्ध असलेली शेती विषयी व इतर माहिती जसे कि, हवामान, पिक संगोपन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुकूट पालन, शासकीय योजना, कायदे, समाज कल्याण यांची माहिती शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक यांना समजून सांगणे.
  • १०. आपल्या गावातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक व व्यापारी यांच्या तक्रारीचे निवारण करणे.
  • ११. सर्व ऑन लाईन रिपोर्ट्स दररोज अद्यावत करणे.
  • १२. महामंडळ कमेटी / जिल्हा व्यवस्थापक / तालुका समन्वयकयांचे सूचनेप्रमाणे काम करणे व रिपोर्ट महामंडळाच्या पोर्टलवर अद्यावत करणे.
X

भूमिका आणि जबाबदाऱ्या

तालुका समन्वयक

  • १. आपल्या तालुक्यातील ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाचे कार्य करण्यासाठी कृषी मित्र टीम तयार करणे व त्यांना योग्य मार्गदर्शन, ट्रेनिंग व प्रोस्ताहन देणेव त्यांच्या कामाचे संपूर्ण नियोजन करणे.
  • २. आपल्या क्षेत्रातील कामकाजावर नियंत्रण ठेवणे व ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्या टीमला मदत करणे.
  • ३. आपल्या तालुक्यात महामंडळाचे ऍग्रो सर्विसेस सेंटर उभारणी तसेच त्याचे व्यवस्थापन, आणि मार्केटिंग करणे.
  • ४. आपल्या तालुक्यातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक, व्यापारी व कृषी मित्र यांच्या तक्रारीचे निवारण करणे.
  • ५. आपल्या तालुक्यातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक यांच्या पिक लागवड, तयार माल, मालाची प्रतवारी व गुणवत्ता, मालाचे वजन, दूधउत्पादन, पशु संख्या, विक्रीसाठी उपलब्ध असलेले पशुधन, वाहतूक, शेतकरी पेमेंट, इ. याविषयी महामंडळाच्या पोर्टल वर माहिती गावनिहाय अद्यावत करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
  • ६. ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाचे कार्य आणि संकल्पना शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक, व्यापारी, निर्यातदार यांच्यापर्यंत पोहचवणे.
  • ७. आपल्या तालुक्यातील सर्व ऑन लाईन रिपोर्ट्स दररोज अद्यावत करणे.
  • ८. कृषी मित्रांच्या कामावर नियंत्रण ठेवणे व त्यांच्या कामाचा पाठपुरावा करून पूर्ण करून घेणे.
  • ९. आपल्या तालुक्यातील सर्व कामकाजाचा रोजच्यारोज जिल्हा व्यवस्थापक यांचे कडे रोपोर्ट करणे.
  • १०. महामंडळ कमेटी / जिल्हा व्यवस्थापक यांचे सूचनेप्रमाणे काम करणे, रिपोर्ट करणेव आपल्या तालुक्यातील टीमकडून ते काम पूर्ण करून घेणे.
X

भूमिका आणि जबाबदाऱ्या

जिल्हा व्यवस्थापक

  • १. आपल्या जिल्हातील ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाचे कार्य करण्यासाठी तालुका समन्वयक व किसान मित्र टिम तयार करणे व त्यांना योग्य मार्गदर्शन, ट्रेनिंग व प्रोस्ताहन देणे त्यांच्या कामाचे संपूर्ण नियोजन करणे.
  • २. आपल्या जिल्हातील महामंडळाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे व महामंडळाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्या टीमला मदत करणे.
  • ३. आपल्या जिल्यामध्ये व तालुकानिहाय महामंडळाचे ऍग्रो सर्विसेस सेंटर उभारणी करणे त्यांचे व्यवस्थापन, आणि मार्केटिंग करणे.
  • ४. आपल्या जिल्हातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक, व्यापारी, तालुका समन्वयक व कृषी मित्र यांच्या तक्रारीचे निवारण करणे.
  • ५. आपल्या जिल्हातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक यांच्या पिक लागवड, तयार माल, मालाची प्रतवारी व गुणवत्ता, मालाचे वजन, दूधउत्पादन, पशु संख्या, विक्रीसाठी उपलब्ध असलेले पशुधन, वाहतूक, शेतकरी पेमेंट, इ. याविषयी महामंडळाच्या पोर्टल वर माहिती गावनिहाय अद्यावत करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
  • ६. ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाचे कार्य आणि संकल्पना शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक, व्यापारी, निर्यातदार यांच्यापर्यंत पोहचवणे.
  • ७. आपल्या तालुक्यातील सर्व ऑन लाईन रिपोर्ट्स दररोज अद्यावत करणे.
  • ८. तालुका समन्वयक आणि कृषी मित्रांच्या कामावर नियंत्रण ठेवणे व त्यांच्या कामाचा पाठपुरावा करून पूर्ण करून घेणे.
  • ९. आपल्या जिल्हातील सर्व कामकाजाचा रोजच्यारोज महामंडळ कमेटी यांचे कडे रोपोर्ट करणे.
  • १०. महामंडळ कमेटी सूचनेप्रमाणे काम करणे व रिपोर्ट करणे व आपल्या जिल्यातील टीमकडून ते काम पूर्ण करून घेणे.

अस्वीकरण:-

ग्रामीण कृषी विकास व पशुवर्धन महामंडळ लिमिटेड ही खाजगी क्षेत्रातील सार्वजनिक मर्यादित कंपनी आहे, जी कोणत्याही प्रकारची सरकारी सेवा, सरकारी लाभ, सरकारी योजना देत नाही. आमच्या या अधिकृत वेबसाइटवर दिलेली माहिती, मेल आयडी आणि फोन अधिकृत मानली जावी.