करिअर मॉडेल

महत्वाची माहिती

 • ज्या अर्जदारांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत त्यांना पुढील माहितीसाठी सॉफ्टवेअरद्वारे ई-मेल करण्यात आले आहे.

 • जिल्हा व्यवस्थापक आणि तालुका समन्वयक या पदांसाठी मुलाखती एप्रिल २०२३ नंतर घेतल्या जातील* आणि कृषमित्र या पदांसाठी मुलाखती जून २०२३ नंतर घेतल्या जातील. मुलाखतीच्या १५ दिवस आधी तारीख, वेळ आणि ठिकाण कळवले जाईल.

करिअर

ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाच्या विविध सेवांच्या सुलभ प्रशासन आणि व्यवस्थापनासाठी सुशिक्षित, शिस्तबद्ध, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम, प्रभावी व्यक्तिमत्त्वे असलेल्या लढवय्या असलेल्या व्यक्तीची महामंडळास आवश्यकता आहे. महामंडळाच्या कृषी व पशुसंवर्धन सेवांसाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा व्यवस्थापक, तालुका समन्वयक आणि कृषी मित्र या पदांसाठी इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागवत आहोत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एक व्यवस्थापन साखळी तयार केली जाईल जी माहिती अद्ययावत करण्यात आणि आपले दैनंदिन कामकाज चालविण्यात मदत करेल.

कृषी मित्र

कृषी मित्र हे महामंडळाच्या राज्यव्यापी साखळीमधील एक मूलभूत आणि ग्राउंड लेव्हलचे पद आहे. हे पद प्रत्येक गावात एक आहे असणार आहे. कृषी मित्रच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत: अधिक वाचा

पात्रता

 • शैक्षणिक पात्रता - किमान दहावी (एस.एस.सी) पास किंवा अधिक
 • आवश्यक इंटरनेट, स्मार्ट फोन आणि संगणक ज्ञान.
 • शेती, शेतीव्यवसाय, पीक पद्धती, शेतकरी पशुसंवर्धन याबद्दल माहित असणे आवश्यक.

थोडक्यात

 • पद नाव - कृषी मित्र
 • एकूण पद - राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक
 • कामाचे क्षेत्र - ग्रामपंचायत पातळी
 • वय मर्यादा - वय २० ते ४० वर्षे
 • निवड प्रक्रिया - मुलाखत / प्राधान्य आधार
 • मासिक वेतन - दरमहा १०,००० ते १५,०००रुपये
X

भूमिका आणि जबाबदाऱ्या

कृषी मित्र

 • १. आपल्या गावातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक, व्यापारी, कंपनी, निर्यातदार, उपभोक्ता यांना ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळा विषयी माहिती देणे व त्याचे फायदे सांगणे.
 • २. आपल्या गावातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक,व्यापारी व सेवा देणारे (वाहतूक, हमाल, वजन करणारे, मालाची गुणवत्ता ठरवणारे) यांची महामंडळाच्या पोर्टलवर नोंद करणे.
 • ३. आपल्या गावातील शेतकऱ्यांनी सध्या पेरणी व लागवड केलेले सर्व पिकाची माहिती आणि दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक यांच्याकडे असणाऱ्या पशुधनाची आणि दूधउत्पदनाची सर्व माहिती महामंडळाच्या पोर्टलवर भरणे.
 • ४. आपल्या गावातील शेतकरी, दूधउद्पादक यांना लागणारे सर्व साधने, खाते, बियाणे, औषधे, औजारे, खाद्य इ. महामंडळाच्या ऍग्रो सर्विसेस सेंटर मार्फत उपलब्ध करून देणे.
 • ५. विक्री साठी तयार असलेल्या पिकाची, दुधाची, पशुधनाची माहिती घेणे, गुणवत्ता व प्रतवारी ठरवणे.
 • ६. विक्री साठी तयार असलेल्या पिक, दुधाची, पशुधनाची व संबधित शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक यांची माहिती लॉट तयार करून विक्रीसाठी महामंडळाच्या ऍग्रो सर्विसेस सेंटरला देणे .
 • ७. विक्री व्यवहार झाल्यावर शेती मालचे वजन करून, पशुधन, दुधाचे संकलन करून पशुधन महामंडळाच्या ऍग्रो सर्विसेस सेंटरवर पोहचवणे, बिले व खरेदी-विक्रीचा करार तयार करणे.
 • ८. विक्री झालेला शेती माल, दुधाची, पशुधन व्यवस्थित व्यापारी/उपभोक्ता यांच्यापर्यंत पोहचेल याची व्यवस्था करणे.
 • ९. महामंडळाच्या पोर्टलवर उपलब्ध असलेली शेती विषयी व इतर माहिती जसे कि, हवामान, पिक संगोपन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुकूट पालन, शासकीय योजना, कायदे, समाज कल्याण यांची माहिती शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक यांना समजून सांगणे.
 • १०. आपल्या गावातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक व व्यापारी यांच्या तक्रारीचे निवारण करणे.
 • ११. सर्व ऑन लाईन रिपोर्ट्स दररोज अद्यावत करणे.
 • १२. महामंडळ कमेटी / जिल्हा व्यवस्थापक / तालुका समन्वयकयांचे सूचनेप्रमाणे काम करणे व रिपोर्ट महामंडळाच्या पोर्टलवर अद्यावत करणे.

पात्रता

 • शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर /कृषी पदविका
 • आवश्यक इंटरनेट, स्मार्ट फोन, संगणक ज्ञान आणि कार्यसंघ नेता कौशल्य
 • तालुक्यविषयी आणि तालुक्यमधील शेत, शेतीव्यवसाय, पीक पद्धती, शेतकरी, पशुसंवर्धन, गावें याबद्दल माहित असणे आवश्यक.

थोडक्यात

 • पदाचे नाव - तालुका समन्वयक
 • एकूण पद - राज्यातील प्रत्येक तालुका / तहसील क्षेत्रात एक
 • कामाचे क्षेत्र - तालुका / तहसील पातळी
 • वय मर्यादा - वय २२ ते ४० वर्षे
 • निवड प्रक्रिया - मुलाखत / प्राधान्य आधार
 • मासिक वेतन - दरमहा १५,००० ते २०,०००रुपये

तालुका समन्वयक (पद)

तालुका समन्वयक हे महामंडळाच्या राज्यव्यापी साखळीमधील द्वितीय स्तराचे पद आहे. हे पद प्रत्येक तालुक्यासाठी एक आहे. तालुका समन्वयक हे कृषी मित्र आणि जिल्हा व्यवस्थापक यांच्यामधील मध्यम अधिकारी आहेत. तालुका समन्वयकांची भूमिका आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत: अधिक वाचा

X

भूमिका आणि जबाबदाऱ्या

तालुका समन्वयक

 • १. आपल्या तालुक्यातील ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाचे कार्य करण्यासाठी कृषी मित्र टीम तयार करणे व त्यांना योग्य मार्गदर्शन, ट्रेनिंग व प्रोस्ताहन देणेव त्यांच्या कामाचे संपूर्ण नियोजन करणे.
 • २. आपल्या क्षेत्रातील कामकाजावर नियंत्रण ठेवणे व ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्या टीमला मदत करणे.
 • ३. आपल्या तालुक्यात महामंडळाचे ऍग्रो सर्विसेस सेंटर उभारणी तसेच त्याचे व्यवस्थापन, आणि मार्केटिंग करणे.
 • ४. आपल्या तालुक्यातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक, व्यापारी व कृषी मित्र यांच्या तक्रारीचे निवारण करणे.
 • ५. आपल्या तालुक्यातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक यांच्या पिक लागवड, तयार माल, मालाची प्रतवारी व गुणवत्ता, मालाचे वजन, दूधउत्पादन, पशु संख्या, विक्रीसाठी उपलब्ध असलेले पशुधन, वाहतूक, शेतकरी पेमेंट, इ. याविषयी महामंडळाच्या पोर्टल वर माहिती गावनिहाय अद्यावत करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
 • ६. ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाचे कार्य आणि संकल्पना शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक, व्यापारी, निर्यातदार यांच्यापर्यंत पोहचवणे.
 • ७. आपल्या तालुक्यातील सर्व ऑन लाईन रिपोर्ट्स दररोज अद्यावत करणे.
 • ८. कृषी मित्रांच्या कामावर नियंत्रण ठेवणे व त्यांच्या कामाचा पाठपुरावा करून पूर्ण करून घेणे.
 • ९. आपल्या तालुक्यातील सर्व कामकाजाचा रोजच्यारोज जिल्हा व्यवस्थापक यांचे कडे रोपोर्ट करणे.
 • १०. महामंडळ कमेटी / जिल्हा व्यवस्थापक यांचे सूचनेप्रमाणे काम करणे, रिपोर्ट करणेव आपल्या तालुक्यातील टीमकडून ते काम पूर्ण करून घेणे.

जिल्हा व्यवस्थापक (पद)

जिल्हा व्यवस्थापक हे महामंडळाच्या राज्यव्यापी नेटवर्कमधील उच्च स्तरीय पद आहेत. हे पद प्रत्येक जिल्ह्यासाठी एक आहे. जिल्हा व्यवस्थापक, कृषी मित्र आणि महामंडळाचे प्रकल्प संचालक यांच्यामधील मध्यम अधिकारी आहेत. तालुका समन्वयकांची भूमिका आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत: अधिक वाचा

पात्रता

 • शैक्षणिक पात्रता - बी.एससी / एम.एस्सी. पीजी कृषि-व्यवसाय व्यवस्थापन / बी.व्हि. एस.सी. (पशुवैदयकियशास्त्र) किंवा पदविका / एमबीए विपणन / कृषि व्यवसाय
 • आवश्यक इंटरनेट, स्मार्ट फोन, संगणक ज्ञान आणि कार्यसंघ नेता कौशल्य
 • जिल्ह्याविषयी आणि जिल्ह्यातील शेती, शेतीव्यवसाय, पीक पद्धती, शेतकरी, पशुसंवर्धन याबद्दल माहित असणे आवश्यक.

थोडक्यात

 • पदाचे नाव - जिल्हा व्यवस्थापक
 • एकूण पद - राज्यातील प्रत्येक
 • जिल्ह्यात एक
 • कामाचे क्षेत्र - जिल्हा पातळी
 • वय मर्यादा - वय २५ ते ४० वर्षे
 • निवड प्रक्रिया - मुलाखत / प्राधान्य आधार
 • मासिक वेतन - दरमहा २०,००० ते ३०,०००रुपये
X

भूमिका आणि जबाबदाऱ्या

जिल्हा व्यवस्थापक

 • १. आपल्या जिल्हातील ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाचे कार्य करण्यासाठी तालुका समन्वयक व किसान मित्र टिम तयार करणे व त्यांना योग्य मार्गदर्शन, ट्रेनिंग व प्रोस्ताहन देणे त्यांच्या कामाचे संपूर्ण नियोजन करणे.
 • २. आपल्या जिल्हातील महामंडळाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे व महामंडळाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्या टीमला मदत करणे.
 • ३. आपल्या जिल्यामध्ये व तालुकानिहाय महामंडळाचे ऍग्रो सर्विसेस सेंटर उभारणी करणे त्यांचे व्यवस्थापन, आणि मार्केटिंग करणे.
 • ४. आपल्या जिल्हातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक, व्यापारी, तालुका समन्वयक व कृषी मित्र यांच्या तक्रारीचे निवारण करणे.
 • ५. आपल्या जिल्हातील शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक यांच्या पिक लागवड, तयार माल, मालाची प्रतवारी व गुणवत्ता, मालाचे वजन, दूधउत्पादन, पशु संख्या, विक्रीसाठी उपलब्ध असलेले पशुधन, वाहतूक, शेतकरी पेमेंट, इ. याविषयी महामंडळाच्या पोर्टल वर माहिती गावनिहाय अद्यावत करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
 • ६. ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाचे कार्य आणि संकल्पना शेतकरी, दूधउद्पादक, पशुपालक व पक्षीपालक, व्यापारी, निर्यातदार यांच्यापर्यंत पोहचवणे.
 • ७. आपल्या तालुक्यातील सर्व ऑन लाईन रिपोर्ट्स दररोज अद्यावत करणे.
 • ८. तालुका समन्वयक आणि कृषी मित्रांच्या कामावर नियंत्रण ठेवणे व त्यांच्या कामाचा पाठपुरावा करून पूर्ण करून घेणे.
 • ९. आपल्या जिल्हातील सर्व कामकाजाचा रोजच्यारोज महामंडळ कमेटी यांचे कडे रोपोर्ट करणे.
 • १०. महामंडळ कमेटी सूचनेप्रमाणे काम करणे व रिपोर्ट करणे व आपल्या जिल्यातील टीमकडून ते काम पूर्ण करून घेणे.

निवड प्रक्रिया

महामंडळातील निवड प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने केली जाते

 • 01

  अग्रगण्य वृत्तपत्रांद्वारे जाहिरातीचे प्रकाशन

 • 02

  पदानुसार अर्ज करणे

 • 03

  अर्ज भरल्याची पावती

 • 04

  अर्जांची छाननी करून जिल्हा आणि तालुकानिहाय यादी तयार करणे

 • 05

  पदानुसार पात्रतेच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करणे

 • 06

  पात्रतेनुसार पात्र अर्जदारांना मुलाखतीसाठी आमंत्रित करणे

 • 07

  सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे

 • 08

  निवडलेल्या अर्जदारांना पदाच्या अटी व शर्तींनुसार सशुल्क प्रशिक्षण देणे

 • 09

  प्रशिक्षणानंतर नियमानुसार नेमणूक करणे

ग्रामीण कृषी विकास व पशुसंवर्धन महामंडळाबरोबर
काम करण्याची संधी आणि यशस्वी होण्याचे हे एका माध्यम आहे.

स्थानिक पातळीवर रोजगार संधी

महामंडळ तुम्हला तुमच्या क्षेत्रामध्ये म्हणजेच ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. ग्रामीण भागामध्ये शेती आणि शेती क्षेत्राशी निगडित कामाचा अनुभव आणि कौशल्य विकसित करण्याची सुवर्ण संधी मिळते.

कार्यशील कार्याचा अनुभव

तुम्हाला कामाचा अनुभव आणि ज्ञान मिळू शकेल जो अमूल्य असेल. तुम्हाला तुमच्या निवडलेल्या कार्यक्षेत्रातील वास्तविक कामाच्या अनुभवांवर अधिग्रहित ज्ञान लागू करण्याची संधी असेल. तुम्हाला उद्योगातील अन्य अनुभवी आणि कुशल कार्यसंघ सदस्यांसह काम करण्याचा अनुभव मिळतो.

नोकरीच्या बाजारात एक धार मिळवा

सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपण असा काही कामाचा अनुभव मिळवा जो कि संभाव्य नियोक्तांसाठी एक मोठा प्लस पॉइंट आहे. जसे की तुम्हाला सहसा कमी प्रशिक्षण आवश्यक असेल आणि तुम्ही अधिक हाताळण्या योग्य होऊ शकता.

मौल्यवान कामाचा अनुभव मिळवा

महामंडळाबरोबर काम करताना आपले ज्ञान आणि कौशल्ये विकसित आणि परिपक्व होऊनतुम्हला तुमच्या करियरच्या उच्च पातळीवर पोहचवता येईल.

कौशल्ये विकसित आणि परिपक्व करा

आम्ही आपल्याला एक अद्वितीय शिकण्याची संधी आणि आपले ज्ञान आणि कौशल्ये विकसित आणि परिपक्व करण्याचे संधी देऊ.

वित्तीय स्थिरता मिळवा

आमच्या बरोबर काम करताना तुम्हाला मौल्यवान कामाचा अनुभव आणि आर्थिक स्थैर्य मिळेल